मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या कामाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित वर्षभरापूर्वी करण्यात आले होते. मात्र, कामाला गती मिळाली नव्हती. दरम्यान, शिवस्मारकाचे कंत्राट 'एल अँड टी' कंपनीला मिळालेय. त्यामुळे कामाल गती मिळणार आहे.
शिवस्मारकाच्या भूमीपूजनाच्या वर्षभरानंतर शिवस्मारकाचं कंत्राट 'एल अँड टी' कंपनीला मिळाले आहे. 'एल अँड टी' ३६ महिन्यांत काम पूर्ण करणार आहे, अशी माहिती आज विधान परिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. शिवरायांचे स्मारक अरबी समुद्रात ६.८ हेक्टरवर स्मारक उभारण्यात येणार आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत माहिती देताना सांगितले.
साधारण अडीच हजार कोटी आणि जीएसटी अशी पहिल्या टप्प्यातील स्मारकाची किंमत असेल असं बोललं जातंय. शिवस्मारक अरबी समुद्रात 6.8 हेक्टरवर उभं राहिल. पावसाळ्यानंतर या स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल. तोपर्यंत कंपनी कामाचा आढावा घेईल, अशी माहितीही पाटील यांनी दिलीय.