मंत्रिपदाचा निर्णय होईपर्यंत खासदारकीची भाजपकडून ऑफर - राणे

राज्यात मंत्रिपदाचा निर्णय होईपर्यंत खासदारकी स्वीकारण्याची भाजपकडून ऑफर असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिलीय. 

Updated: Mar 1, 2018, 05:00 PM IST
मंत्रिपदाचा निर्णय होईपर्यंत खासदारकीची भाजपकडून ऑफर - राणे title=

दीपक भातुसे / मुंबई : राज्यात मंत्रिपदाचा निर्णय होईपर्यंत खासदारकी स्वीकारण्याची भाजपकडून ऑफर असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिलीय. 

राणेंची काम सुरळीत सुरु आहे

कालच्या दिल्लीतल्या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचंही राणेंनी झी 24 तासला सांगितलं. कालच्या बैठकीत नेमकं काय झालं? आणि राणेंच्या मनात नेमकं काय आहे ? याबाबत राणेंनी आपली भूमिका मांडली. राणेंचे कोणामुळे काहीही अडलेले नाही. राणेंची काम सुरळीत सुरु आहे. राणेंची कोणाला चिंता नको. काल मी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भेटलो आणि चर्चा केली. त्यावेळी चांगली चर्चा झाली, असे राणे म्हणालेत.

'भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण करणार'

अमित शाह यांनी स्पष्ट केलेय की, भाजपने जे आश्वासन दिलेय ते पूर्ण करेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते पूर्ण करावे, असे स्पष्ट सांगितलेय. तसेच मुख्यमंत्री यांनीही माझ्यापुढे काही अडचणी आहेत. त्या मी दूर करत आहे. त्यानंतर लगेचच तुम्हाला जे मंत्री बनविले जाईल, असे स्पष्ट केलेय. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळेल, हे नक्की, अशी माहिती राणे यांनी यावेळी दिली.

माझ्या काही अटी आहेत!

माझा पक्ष भाजपसोबत राहणार का, असे अमित शाह यांनी विचारले. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मात्र, माझ्या पक्षाच्या काही अटी आहेत. काही ध्येय आहेत. त्याबाबत बोलणे झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याबाबत अजून विचार केलेला नाही. निवडणुका होण्याआधी सहा महिने याबाबत विचार करुन सांगितले जाईल. हे स्पष्ट केलेय. मात्र, सध्या खासदारकीची ऑफर आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी माहिती राणे यांनी यावेळी दिली.