Mumbai Viral Video : मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. हे प्रत्येकाला आपल्या हक्काचं छोटं का होईना पण घर असावं असं सर्वसामान्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी म्हाडा असो किंवा सिडको या सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. गेल्या काही वर्षांमध्ये घराच्या किंमती गगणाला भिडल्या आहे. मुंबईसारख्या शहरात चार बाय चारच घर घेणं पण अनेकांच्या अवाक्या बाहेरचं होत चाल आहे. मुंबई हे एवढी मोठी नगरी आहे यात लाखो लोक एकत्र राहतात. मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईत छोटे आणि उंच इमारती आहेत. या उंच उंच इमारतीच्या जाळ्यात दक्षिण मुंबईतील एका घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे घरं पाहून नेटकरी थक्कं झाले आहेत. (south mumbai 2 5 crore 1bhk micro house video viral today trending news)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवर सुमित पालवे या तरुणाने दक्षिण मुंबईतील 2.5 कोटी रुपयांचं घर दाखवलं आहे. हे घर पाहून तुम्ही पण डोक्याला हात मारून घ्याल. एवढं कोटींचं घर म्हणजे एखाद्या महाला सारख असेल असं तुम्हाला वाटतं असेल. पण या व्हिडीओमध्ये या तरुणाने मुंबईतील सत्य म्हणा किंवा वास्तव म्हणा समोर आणलं आहे. हा तरुण कॉरिडॉरमधून एका खोलीत प्रवेश करतो. त्यानंतर तो एका छोट्या स्टोअर रुमचं वर्णन तो मास्टर बेडरुम म्हणून करतो. या बेडरुममध्ये एका बॉक्सवर गादी ठेवून पलंग बनविण्यात आला आहे. या रुममध्ये सर्व सामानासकट एसीदेखील आहे. या रुममध्ये 4 लोक कसेबसे उभे राहतील एवढीच जागा आहे.
आता त्याने स्वयंपाकघर दाखवतो ते पाहून ते तुम्हाला धक्का बसेल. तो स्वयंपाकघर खोलीतून बाहेर येतो आणि पुन्हा कॉरिडॉरमध्ये जातो. त्यानंतर एका लहानशा जागेत स्वयंपाकघर दाखवतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघराला जवळजवळ जोडलेले बाथरूम आहे. हे बाथरूम पाहून ते तुम्हाला विश्वास बसणार नाही. या बाथरुमच्या छताची उंची इतकी कमी आहे की, तुमचं डोकं त्याला आदळेल.
त्यानंतर हा तरुण गच्चीकडे वळतो, त्यासाठी तो अतिशय जुगाडाने बनवलेल्या शिडीवरून तो चढतो आणि लहानश्या खोलीतील खिडकीतून बाहेरचं दृश्यं दाखवतो. त्यानंतर तो म्हणतो की, 'तुम्हाला तडजोड करावी लागेल बॉस, ही दक्षिण मुंबई आहे'
हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका यूजर्सने कमेंट केलं आहे की, भाऊ, हे पाहिल्यानंतर माझं छोटेसं घरही महाल वाटू लागलंय. दरम्यान हा फ्लॅट 2.5 कोटींचा आहे की नाही याबद्दल काही पुष्ट नाही. मात्र हा व्हिडीओ एक प्रँक आहे की नाही याबद्दलही काही सांगता येतं नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष मात्र वेधन्यात यशस्वी होणार आहे.