मुंबई : मुंबईतील वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाचा सायनचा उड्डाणपूल येत्या १ डिसेंबरपासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. उड्डाण पुलाची डागडुजी करण्यासाठी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
येत्या १ डिसेंबरपासून मुंबईकरांना मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. मुबंई पोलिसांनी ही कोंडी होऊ नये म्हणून अनेक पर्याय शोधले आहेत. पण हे पर्याय कितपत यशस्वी होतात हे १ डिसेंबरनंतर समोर येणार आहे. सायनचा उड्डाण पूल १.१ किलोमीटर लांब आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी किमान पाच महिने लागणार आहेत.