Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर, पण...

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंना जामीन, त्या 115 कर्मचाऱ्यांचं काय?  

Updated: Apr 22, 2022, 05:46 PM IST
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर, पण...  title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी घुसून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना अटक केली होती. आता याप्रकरणी सदावर्ते यांना दिलासा मिळाला आहे. 

अॅड गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर झाला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 
सदावर्तेंसह 115 कर्मचाऱ्यांनाही मुंबई सत्र न्यायालयानं जामीन दिलाय. 

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना मुख्य आरोपी तर 115 कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आलं होतं. या कर्मचाऱ्यांना जामीन मिळाला असला तरी त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन घेणार की नाही याबाबत अजून काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

सदावर्ते कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीत
मात्र छत्रपतींचा अवमान केल्याच्या प्रकरणात सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यामुळे जामीन मंजूर झाला असला तरी ते बाहेर मात्र येणार नाहीयेत.