Mumbai News : 'हे' बाप्पाचे प्रसिद्ध मंदिर आजपासून 5 दिवस बंद

Siddhivinayak Temple :  गणेशभक्तासांठी महत्त्वाची बातमी आहे. 

Updated: Dec 14, 2022, 08:03 AM IST
Mumbai News : 'हे' बाप्पाचे प्रसिद्ध मंदिर आजपासून 5 दिवस बंद  title=
Siddhivinayak Mandir 14 to 18 December 2022 Bandh and Siddhivinayak Temple closed for next 5 days Latest News in Mumbai

Siddhivinayak Mandir Bandh : मुंबईकरांचं (Mumbai) श्रद्धा स्थान आणि आराध्य दैवत असलेलं प्रभादेवीचं (Prabhadevi) सिद्धिविनायक गणपती (Siddhivinayak Temple)मंदिर...सिध्दिविनायक मंदिर आजपासून बंद असणार आहे. श्रींच्या मूर्तीचं दर्शन आजपासून पाच दिवसांसाठी बंद (closed) राहणारंय. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. (Siddhivinayak Mandir 14 to 18 December 2022 Bandh and Siddhivinayak Temple closed for next 5 days Latest News in Mumbai)

त्यामुळे आजपासून 18 डिसेंबर दरम्यान मंदिर भक्तांसाठी बंद असणार आहे. याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे... 19 तारखेला गणेशमूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्‍यातून दर्शन घेता येईल, असं सांगण्यात आलं आहे. गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी