दीपाली सय्यद यांची किरीट सोमय्या यांच्यावर बोचरी टीका, थेट म्हणाल्या...

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी किरीट सोमय्या यांना टार्गेट केलं आहे, सोमय्यांना म्हणाल्या... 

Updated: Jun 7, 2022, 03:53 PM IST
दीपाली सय्यद यांची किरीट सोमय्या यांच्यावर बोचरी टीका, थेट म्हणाल्या...  title=

मुंबई : भाजप (BJP) नेत्यांवर केलेल्या टीकेवरुन अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी थेट पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली होती. 

आता दीपाली सय्यद यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. दीपाली सय्यद यांनी ट्विट केलं असून यात त्यांनी 'चिरीट तोम्मया आमदार शिवसेनेला मतदान करतीलच, पण विश्वास तुमच्यावर नाही, दिल्लीचा पैसा आंब्याच्या पेट्या सांगुन हॅलिकॅाप्टरने उतरवाल यांत शंका नाही. पाच वर्षे शिवसेनेची यात शिवसेना लढेलही आणि जिंकेलही' अशी बोचरी टीका केली आहे. 

याआधीही दीपाली सय्यद यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली होती. 'दिल्लीतल्या बापाला प्रतिउत्तर केले तर यांना झोंबत असते. जेव्हा यांचे किरीट बोंबलत फिरते तेव्हा कमळाबाई कुठे लपुन बसते. लबाड लांडगा ढोंग करतंय, महाराष्ट्र प्रेमाच सोंग करतंय. महाराष्ट्रद्रोह्यांना भोसल्यांची लेक पुरून उरणार', असं ट्विट करत दिपाली सय्यद यांनी केलं होतं.

दीपाली सय्यद यांची वादग्रस्त वक्तव्य
पंतप्रधान मोदींवर टीका करताना दीपाली सय्यद यांची जीभ घसरली होती.  भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत या नेत्यांना पाठीशी घालणारा असा लुच्चा पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल अशी टीका दीपाली सय्यद यांनी केली होती.

तसंच काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही बोचरी टीका केली होती. योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का?' असं वादग्रस्त वक्तव्य दीपाली सय्यद यांनी केलं होतं.

याआधीही भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दीपाली सय्यद यांनी टीका केली होती. 'किरीट सोमय्यांच्या जागी मोदी जरी असते तरी गाडी फुटली असती' अशा शब्दात त्यांनी टीका केली होती.