'शी त्यांच्यावर काय बोलायचं...' आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात संपवला नितेश राणेंचा विषय

माझ्या विचारांचा सरपंच निवडून दिला नाही तर निधी देणार नाही अशी धमकी भाजप आमदार Nitesh Rane यांनी कणकवलीतील नांदगावमध्ये दिली होती. यावर प्रश्न विचारला असता Aditya Thackeray यांनी एका वाक्यात विषय संपवला  

Updated: Dec 13, 2022, 02:59 PM IST
'शी त्यांच्यावर काय बोलायचं...' आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात संपवला नितेश राणेंचा विषय title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी अवघ्या एका वाक्यात भाजप नेते (BJP) नितेश राणे (Nitesh Rane) यांचा पाणउतार केला आहे. आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Grampanchayat Election) प्रचारात कणकवलीतील (Kankavali)नांदगावच्या ग्रामस्थांना धमकी दिली होती. यावरुन बराच वाद रंगला.  'माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी गावाच्या विकासाला निधी देणार नाही, अशी धमकीच नितेश राणे  यांनी कणकवलीतील नांदगावच्या ग्रामस्थांनी दिली. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही, निधी वाटप आता माझ्या हातात आहे, हे लक्षात ठेवा असंही ते म्हणालेत. यावर आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. पण आदित्य ठाकरे यांनी नितेश राणे यांचं नाव ऐकताच 'शी त्यांच्यावर काय बोलायचं' असं म्हणत अवघ्या एका वाक्यात विषय संपवला.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका
यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनाही टोला लगावला आहे. आज मुख्यमंत्री कोण आहे ते माहीतच नाही, मुख्यमंत्री चॉकलेट देऊन लोकांना गोळा करतात गाजर देतात अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. राज्यातून प्रकल्प बाहेर जात असून राज्यातील तरुणांना रोजगार कसा मिळणार असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने खासजगीकरण (Privatization) करताना कामगारांचा विचार केला पाहिजे,  इतर राज्यात गुंतवणूक केली त्याचे दुःख नाही, पण आपल्या राज्यात जी गुंतवणूक येणार होती ती हिसकावून इतर राज्याला देण्यात आली, ती आपली हक्काची गुंतवणूक होती याविरोधात आपल्याला एकत्र आला पाहिजे असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. 

पुणे बंदला लोकांची साथ
शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News in Marathi) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. आजच्या बंदला लोकांची साथ आहे,  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

हे ही वाचा : Samruddhi Mahamarga : काल कार अपघात, आज समृद्धी महामार्गावर पुलाखाली अडकला ट्रक

17 तारखेच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन

राज्यपाल प्रत्येकवेळी अपमान करत आले आहेत, त्यांनी आतापर्यंत राजीनामा द्यायला हवा होता, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.  ज्यांना आपले रोजगार पळवले याचा राग आहे त्यांनी १७ तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. राज्यपालांना आम्ही राज्यपाल मानत नाहीत इतकी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही त्यांना पदावरून दूर करण्यात आले नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.