मुंबई : राज्यातल्या योजनांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याचप्रमाणे मराठी केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासदारांची मुख्यमंत्र्याबरोबर बैठक झाली. या बैठकीला 30 पेक्षा जास्त खासदार उपस्थित होते.
राज्यात राबवणा-या केंद्राच्या योजनांबाबत पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याबद्दल शिवसेनेच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात रस्ते बांधणारी पंतप्रधान ग्रामसडक योजना बंद आहे, याबाबद्दल खासदार विनायक राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या योजना कार्यन्वित व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यनी प्रस्ताव पाठवावा अशी मागणी राऊत यांनी केली. तर मुंबईतील नवीन आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
तर केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार येऊन सुद्धा मराठी भाषेला अभिजात दर्जा अजूनही न मिळाल्याबद्दल खासदार सावंत यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली
खासदार गोपाळ शेट्टी कोळी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेस आघाडीच्या काळात मान्यता मिळालेला कराड - चिपळूण रेल्वे प्रकल्प सुरू करण्याची मागणी कॉग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.