मंत्रीपद सोडेन आणि कोकणातील लोकांच्या पाठीशी उभे राहीन - सुभाष देसाई

आज विधानपरिषदेत नाणार रिफायनरी प्रक्रल्पबाबत लक्षवेधी प्रश्नांचा तास झाला. यात शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई हे नाणार प्रकल्पाविरोधात चांगलेच आक्रामक झाल्याचे बघायला मिळाले.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 7, 2018, 12:43 PM IST
मंत्रीपद सोडेन आणि कोकणातील लोकांच्या पाठीशी उभे राहीन - सुभाष देसाई title=

मुंबई : आज विधानपरिषदेत नाणार रिफायनरी प्रक्रल्पबाबत लक्षवेधी प्रश्नांचा तास झाला. यात शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई हे नाणार प्रकल्पाविरोधात चांगलेच आक्रामक झाल्याचे बघायला मिळाले.

काय विचारला प्रश्न?

नाणार रिफायनरी मुळे तेथील ग्रामव्यवस्थाच नाही तर परिसरमधील निसर्ग - आंबा उद्योग नष्ट होणार आहे. प्रकल्पग्रस्ताचा मोठा विरोध आहे. हा प्रकल्प रद्द करणार का ? असा प्रश्न हुस्नाबानू खलिफे यांनी विचारला होता.   

काय म्हणाले सुभाष देसाई?

यावर सुभाष देसाई म्हणाले की, ‘विरोध असल्याने भूसंपादन प्रक्रिया थांबवली आहे. नाणार आणि परिसरमधील ग्रामस्थानी प्रकल्पाविरोधात ठराव केले आहेत, प्रकल्प रद्द करावा याबाबत मोठी मागणी आहे. शेवटी हा केंद्राचा प्रकल्प आहे. तेव्हा रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. सध्या मोठा विरोध असल्याने उद्योग विभागाचे म्हणणे आहे की, या प्रकल्पाबाबत भुसंपादन करणे अशक्य आहे.

‘मंत्रीपद सोडून देईन’

आम्ही बैठक घेऊन एकत्रित निर्णय घेऊ. सरकारचा निर्णय एकच असेल. एकवेळ मंत्रीपद सोडून देईन. मात्र कोकणातील लोकांच्या पाठीशी उभे राहीन, असेही सुभाष देसाई म्हणाले. 

‘सरकारमध्ये मतप्रवाह’

मुख्यमंत्री म्हणतात की प्रकल्प होणारच. उद्योगमंत्री वेगळे म्हणतात. या सरकारमध्ये दोन वेगळे मतप्रवाह आहेत हेच यावरून दिसून येत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.