हॉटेल ललित इंटरकॉन्टिनेंटल हल्ला, शिवसेना नेत्यांची निर्दोष मुक्तता

हॉटेल ललित इंटरकॉन्टिनेंटलवर झालेल्या हल्ल्यातून शिवसेना नेत्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Updated: Aug 29, 2018, 10:05 PM IST
हॉटेल ललित इंटरकॉन्टिनेंटल हल्ला, शिवसेना नेत्यांची निर्दोष मुक्तता title=

मुंबई : हॉटेल ललित इंटरकॉन्टिनेंटलवर झालेल्या हल्ल्यातून शिवसेना नेत्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २००९मध्ये हा हल्ला झाला होता. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापनानं २५ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकलं होतं. याचा जाब शिवसेनेने विचारला होता.

हॉटेल व्यवस्थापनाला याचा जाब विचारण्यासाठी २१ जानेवारी २००९ रोजी हॉटेलवर शिवसेनेच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि हॉटेलची तोडफोड करण्यात आलीय. याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत, अनिल परब, सूर्यकांत महाडिक, सीताराम दळवी यांच्यासह ६१ शिवसैनिकांवर हल्ल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश शिवडी न्यायालयानं दिला आहे.