Sheetal Mhatre : शिवसेनेला धक्का, फायरब्रँड माजी महिला नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात

Sheetal Mhatre Join Rebel Eknath Shinde Mla Group :  शिंदे गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या शीतल म्हात्रे यांनी आता भूमिका बदलली आणि शिंदे गटातच प्रवेश केला. 

Updated: Jul 12, 2022, 11:20 PM IST
Sheetal Mhatre : शिवसेनेला धक्का, फायरब्रँड माजी महिला नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात title=

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेला (Shiv Sena) पहिलं खिंडार पडलंय. शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) शिंदे गटात दाखल झाल्या आहेत. थोड्या वेळापूर्वीत त्यांनी नंदनवन या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. शीतल म्हात्रे शिंदे गटात जाणाऱ्या त्या मुंबईतील पहिल्या नगरसेविका आहेत. (shiv sena former corporater sheetal mhatre join rebel eknath shinde mla group)
 
शीतल म्हात्रेंनी अवघ्या 20 दिवसांपूर्वी अलिबागमध्ये याच शिंदे गटाला इशारा दिला होता. शिंदे गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या म्हात्रे यांनी आता भूमिका बदलली आणि शिंदे गटातच प्रवेश केला. तसेच मुंबईतले इतरही नगरसेवक लवकरच शिंदे गटात येणार असल्याचा दावाही म्हात्रेंनी केलाय.  

दरम्यान शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलंय. शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटामध्ये सहभागी झाल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. या नाराजीतूनच त्यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलंय.