शिवसैनिक हेच शिवसेनेचं 'Brahmastra' दादर राडा प्रकरणातील शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक

'कोणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ' महेश सावंत यांचा इशारा

Updated: Sep 11, 2022, 04:25 PM IST
शिवसैनिक हेच शिवसेनेचं 'Brahmastra' दादर राडा प्रकरणातील शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक  title=

Thackeray Group vs Shinde Group : आताच्या घडीची मोठी बातमी. मुंबईल्या राडा प्रकरणातील शिवसैनिकांचं (Shivsainik) मातोश्रीवर (Matoshree) कौतुक करण्यात आलं आहे. महेश सावंत (Mahesh Sawant) आणि इतर 5 शिवसैनिकांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कौतुक केलंय. शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलीय. महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला देत आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये बसले.

अंगावर आलं तर शिंगावर घेऊ
दरम्यान, कोणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर महेश सावंत यांनी दिली आहे. 2 महिन्यांपासून आम्ही पोलिसांना सांगत होतो त्यांना आवरा. त्यांनी आमच्यावर फायरिंग केली. पोलीस जखमी झाला असता. त्यामुळे आम्हाला आमची ताकद दाखवावी लागली, आम्ही शिवसेनेशी (Shivsena) निष्ठावंत असल्याचं महेश सावंत यांनी म्हटलंय. दोन महिने ते आम्हाला डिवच होते, संयमाचा बांध कधीतरी तुटतोच असंही महेश सावंत यांनी म्हटलं.

कोण आहेत महेश सावंत
जुन्या शिवसैनिकांनी पैकी एक असलेले महेश सावंद आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायते.  पण 2017 मध्ये सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात बिनसलं. 2017 मुंबई महापालिका निवडणुकीत सदा सरवणकर यांनी मुलगा समाधान सरवणकर याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यांमुळे नाराज झालेल्या महेश सावंत यांनी बंड पुकारात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.  मुंबई मनपा निवडणुकीत (Mumbai Municipal Election) समाधान सरवणकर विजयी झाले पण दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार महेश सावंत होते.

काय होता वाद
मुंबईच्या प्रभादेवीत शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील वाद पुन्हा पेटला. गणपती मिरवणुकीतील वादाचं हाणामारीत रुपांतर झालं होतं.  त्यानंतर आज सकाळपासून दोन्ही गट दादर पोलीस स्टेशन परिसरातही आमनेसामने आले.  या राड्याप्रकरणी शिवसेनेच्या महेश सावंत यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली होती. या राड्यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला असा आरोप आमदार सुनील शिंदेंनी केला होता.