मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या रोहीत परब आणि जखमी झालेल्या आकाश परब या दोन्ही भावांच्या कुटुंबियांची भेट शर्मिला ठाकरे यांनी आज विक्रोळीत घेतली. यावेळी त्यांनी या घटनेत मृत्यू पावलेल्या मृतांच्या परिवारातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी आपण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असून बुलेट ट्रेन महाराष्ट्रात आणण्यापेक्षा प्रथम रेल्वेसेवा नीट करा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.