'मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक'

 मराठा आरक्षणाच्या नावाखाली फडणवीस सरकारकडून फसवणूक झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.  

Updated: Nov 23, 2018, 10:42 PM IST
'मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक' title=

मुंबई : मराठा आरक्षणाच्या नावाखाली फडणवीस सरकारकडून फसवणूक झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तर उपसमितीचा जीआर काढणं मुख्यमंत्र्यांची मोठी चूक, असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या नावाखाली फडणवीस सरकारकडून फसवणूक सुरू असल्याचा आरोप शरद पवार यांनी केलाय. तसंच आरक्षणाबाबत नेमलेल्या उपसमितीची पवारांनी यावेळी खिल्ली उडवली. 

तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचा जीआर काढण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. उपसमिती स्थापन करून मुख्यमंत्री आरक्षणाच्या मुद्द्यावर पळ काढत असल्याची टीकाही चव्हाणांनी केली.