मुंबई : शेअर बाजारात (Domestic stock market) आज सोमवारी सामान्य स्वरूपात व्यवहार होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) भारतीय बाजारावर परिणाम झाल्याचं SEBI आणि शेअर बाजारातील अधिकाऱ्यांनी रविवारी स्पष्ट केलं आहे. आज शेअर बाजारात पुन्हा एकदा लोअर सर्किट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिंगापूर बाजारात भारतीय निर्देशांकांची (SGX NIFTY) ची १० ℅ अंकाची घसरण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा लोअर सर्किट लागण्याची शक्यता आहे. शेअर बाजार १० % पेक्षा जास्त कोसळ्यास एक तासासाठी बाजार बंद करण्यात येतो.
All segments at @BSEIndia will operate as usual on Monday 23rd March 2020.
— BSE India (@BSEIndia) March 22, 2020
बीएसई (BSE) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आशीष कुमार चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शेअर बाजार हा सामान्य स्वरूपात उघडणार आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) नुसार आज अतिशय सामान्य स्वरूपात शेअर बाजार उघडणार आहे.
गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये ४,१८७.५२ अंकांनी म्हणजे १२.२७% आणि निफ्टी १,२०९.७५ अंकांनी म्हणजे १२.१५ % घसरण पाहायला मिळाली. संपूर्ण आठवडा घसरण झाल्यानंतर शेअर बाजारात शुक्रवारी थोडी दिलासा देणारी स्थिती आढळली. शुक्रवारी सेन्सेक्स १,६२७.७३ अंक म्हणजे ५.७५ % वाढ पाहायला मिळाली. २९.९१५.९६ अंकांनी बंद झालं.