सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार

 सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार आहे. राज्य़ मंत्रीमंडळ बैठकीत हा  निर्णय घेण्यात आला आहे. 95 नंतर जन्म झालेल्यांना सरपंच पदाची निवडणूक लढवतांना 7 वी पासची अटही घालण्यात आली आहे. 95 च्या आधी जन्मलेल्याना मात्र शैक्षणिक अट नसेल.

Updated: Jul 3, 2017, 02:28 PM IST
सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार title=

मुंबई : सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार आहे. राज्य़ मंत्रीमंडळ बैठकीत हा  निर्णय घेण्यात आला आहे. 95 नंतर जन्म झालेल्यांना सरपंच पदाची निवडणूक लढवतांना 7 वी पासची अटही घालण्यात आली आहे. 95 च्या आधी जन्मलेल्याना मात्र शैक्षणिक अट नसेल.

येत्या सप्टेंबर महिन्यात सुमारे 7 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. ग्रामीण भागांत वर्चस्व स्थापन करण्यासाठी सरकारचा सरकारचा निर्णय असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या निमित्तानं सरपंचाचे अधिकारही वाढवण्यात आले आहेत. ग्रामसभेचा अध्यक्ष आणि ग्रामपंचायत समितीचे अध्यक्ष यापुढे सरपंच असेल. अर्थसंकल्प तयार करून मंजूर करण्याचे अधिकार सरपंचाकडे असतील
गुजरात, मध्य प्रदेशमध्ये असा निर्णय झाला आहे. याचा अभ्यास - दौरा करून माहिती राज्य सरकारने घेतली होती.