'...ही भाषा फारच सौम्य'; शिवराळ भाषेचं राऊत यांच्याकडून समर्थन

Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या शिवराळ भाषेचं समर्थन केल आहे. 'एखादा महाराष्ट्रद्रोही आमच्यावर थुंकत असेल तर ही भाषा फारच सौम्य वाटते' असं राऊत म्हणाले.

Updated: Feb 21, 2022, 09:02 AM IST
'...ही भाषा फारच सौम्य'; शिवराळ भाषेचं राऊत यांच्याकडून समर्थन title=

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या शिवराळ भाषेचं समर्थन केल आहे. 'एखादा महाराष्ट्रद्रोही आमच्यावर थुंकत असेल तर ही भाषा फारच सौम्य वाटते' असं राऊत म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांच्या टीकेचा सूर शिवराळ भाषेत बदलला आहे. त्यामुळे आता राज्यभरातून त्यावर टीकेचे सूर उमटत आहेत. राज्याच्या सुसंस्कृत राजकारणाला ही भाषा शोभेची नाही असे अनेक राजकीय नेते खासगीत चर्चा करीत आहेत.

असे असतानाही संजय राऊत यांनी आपल्या शिवराळ भाषेचं समर्थन केलं आहे. एखादा महाराष्ट्र द्रोही आमच्यावर थुंकत असेल तर ही भाषा फारच सौम्य वाटते असं राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपला पक्ष सांभाळावा असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहेत. ते सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत.