काय चाललंय हे? नेत्यांची जीभेवरचा ताबा सुटला, राजकारणाची पातळी घसरली

महाराष्ट्राच्या राजकारणात होळीआधीच शिमगा सुरू झालाय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे राजकारणी आता हमरीतुमरीवर आलेत.   

Updated: Feb 20, 2022, 10:33 PM IST
काय चाललंय हे? नेत्यांची जीभेवरचा ताबा सुटला, राजकारणाची पातळी घसरली title=

मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात होळीआधीच शिमगा सुरू झालाय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे राजकारणी आता हमरीतुमरीवर आलेत. एकमेकांची उणीधुणी काढणारे राजकीय नेते चक्क शिवीगाळ करू लागलेत. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना झालंय तरी काय? पाहूयात हा खास रिपोर्ट. (maharashtra political ruling and opposition party controvesy between to sanjay raut and kirit somaiya) 

हे आहेत आपले नेते, आणि ही त्यांची भाषा. होळीच्या वेळी एकमेकांच्या नावानं बोंबा मारून शिमगा करण्याची प्रथा आहे. पण या राजकारण्यांनी रोजच शिव्यांचा शिमगा सुरू केलाय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडता झाडता शिव्या देण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.

एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या विरोधकांचा त्यांच्या खास ठाकरी शैलीत समाचार घ्यायचे. पण आता रोखठोक बोलण्याच्या नावाखाली शिवसेनेचे नेते चक्क शिवराळ बोलू लागलेत. शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक असलेले संजय राऊत यात सगळ्यात आघाडीवर आहेत.

संजय राऊत यांची जीभ घसरली. एकदा नव्हे, अनेकवेळा घसरलीय. आपण रोखठोक बोलत नाही, तर शिवराळ बोलतोय, असं तेच सांगतायत. हे कमी झालं म्हणून की काय, किरीट सोमय्याही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतायत. डिक्शनरीत आहेत तेवढ्या शिव्या एकदाच देऊन टाका, असं तेच सांगतायत.