ममता यांच्या मुंबई दौरा आक्षेपावर संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना 'अशा' शब्दात सुनावले

Mamata Banerjee's Mumbai tour : ममता यांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या भाजपला (BJP) शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी जोरदार उत्तर दिले आहे. 

Updated: Dec 2, 2021, 12:43 PM IST
ममता यांच्या मुंबई दौरा आक्षेपावर संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना 'अशा' शब्दात सुनावले title=
संग्रहित छाया

मुंबई :  Mamata Banerjee's Mumbai tour : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौरा केला. या दौऱ्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली. आता ममता यांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या भाजपला (BJP) शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी जोरदार उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत भाजपचा समाचार घेतला आहे.  भाजपचे बेगडी मुंबई प्रेम, असे म्हणत टोला लगावला आहे.  (Sanjay Raut slams BJP leaders over Mamata Banerjee's Mumbai tour)

संजय राऊत म्हणाले, ममता बॅनर्जी मुंबईमध्ये उद्योगपतीना भेटायला आल्या तर  पोटशूळ उठला.  म्हणे, मुंबईतील उद्योग पळवायला आल्यात.  गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत मंत्रिमंडळ घेऊन आलेत. vibrant Gujarat साठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत का, मुंबईत त्यांचा रोड शो होत आहे. मुंबईला ओरबाडून गुजरात  आत्मनिर्भर करणार का, असा सवाल त्यांनी ट्विट करत भाजपला विचारला आहे. 

ममता बॅनर्जी या महाराष्ट्रातील, मुंबईतील उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यासाठी आल्या आहेत. त्यांना शिवसेना मदत करत आहेत, असा आरोप करत जोरदार आक्षेप भाजपने घेतला. यावरुन आमदार आशिष शेलार यांनी टीकाही केली होती. यावरुन संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. तुमचे  मुंबईवर एवढे प्रेम आहे तर मग इतरवेळी कुठे जाते, अशी विचारणा केली आहे. संजय राऊत यांनी यावेळी गुजराच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याची आठवण करुन दिली आहे.