मुंबई : शिवसेनेचे संजय राऊत हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. संजय राऊत हे पवारांचं मुंबईतील सिल्ह्वर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. भाजपा आणि शिवसेना यांच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्यास उशीर होत असताना संजय राऊत हे शरद पवारांच्या घरी आल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
तर दुसरीकडे मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला अजित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे, त्यात अजित पवार आपल्या आमदारकीच्या राजीनाम्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत.
अजित पवार मागील २० तासांपासून कुणाच्याही संपर्कात नव्हते, पण अखेर ते मुंबईत शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचले, त्यांनी तिथे चर्चा केल्यानंतर, ते आता पत्रकार परिषद घेणार आहेत.