'बाडगा मोठ्याने बांग देतो' हल्ल्याचं समर्थन करणाऱ्या उदयनराजेंना टोला

ज्यांना शरद पवार, ज्या पक्षाने मोठं केलं तीच लोकं... संजय राऊत यांनी सुनावलं

Updated: Apr 9, 2022, 11:56 AM IST
'बाडगा मोठ्याने बांग देतो' हल्ल्याचं समर्थन करणाऱ्या उदयनराजेंना टोला title=

मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली.  या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शरद पवारांच्या घरावर झालेल्या या आंदोलनावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'या जन्मी जे करतो ते याच जन्मी फेडावे लागते, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत प्रतिक्रीया दिली आहे.  या गोष्टीपासून कोणी वाचू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

उदयनराजे भोसले यांनी केलेल्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या काही, हे बोलणारे कोण होते, हे कालपर्यंत राष्ट्रवादी होते नंतर भाजपात गेले आहेत, ते शरद पवारांविरुद्ध बोलत होते. हा हलकटपणा आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. 

ज्या शरद पवारांनी, ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं. तुम्ही उपरे आहात, पण बाडगा मोठ्याने बांग देतो, तो प्रकार आम्ही काल पाहिला, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

त्या हल्ल्याचं समर्थन या महाराष्ट्रतील विरोधी पक्षातील लोकं करतायत हा दळभद्री पणाचा कळस आहे, अशा प्रकारे तुम्हाला सरकारला अडचणीत आणता येणार नाही. तुमची बेअब्रु होतेय. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर. त्यांचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात संसदीय लोकशाही पद्धतीत, विकासात, शेती क्षेत्रात जे प्रचंज योगदान आहे. अशा नेत्यावर महाराष्ट्रातच आपल्या लोकांच्या घरावर तुम्ही हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.