How is Josh? संजय राऊतांचा महाराष्ट्राला उत्स्फुर्त सवाल

संजय राऊतांची सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका 

Updated: Nov 28, 2019, 09:49 AM IST
How is Josh? संजय राऊतांचा महाराष्ट्राला उत्स्फुर्त सवाल  title=

मुंबई : माझी जबाबदारी संपली... असं म्हणत संजय राऊतांनी संपूर्ण महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळवून दिला आहे. गेल्या 32 दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रवासात महत्वाची भूमिका बजावली ती शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी. संजय राऊत दररोज सकाळी ट्विट करून आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत होते. 

उद्धव ठाकरेंच्या नावावर मुख्यमंत्री पदाचा शिक्कामोर्तब झाल्यानंतर बुधवारी संजय राऊतांनी 'माझी जबाबदारी संपली, उद्यापासून बोलणार नाही' असं सांगितलं. पण संजय राऊतांनी आज गुरूवारी ट्विट करून संपूर्ण महाराष्ट्राला उत्स्फुर्त सवाल केला आहे. संजय राऊत विचारतात,'How is Josh?' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सायंकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तब्बल 24 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं सरकार सांभाळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये कसा जोश आहे, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. 

ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न पूर्ण होत असताना महाराष्ट्राच्या जनतेला कसं वाटतंय? असा सवाल राऊतांनी केला आहे. शिवसैनिकांकडून आणि शिवसेनेच्या नेते मंडळींकडून उद्धव ठाकरेच मुख्यमंंत्री व्हावेत अशी मागणी होत होती. अखेर महाराष्ट्रविकासआघाडीने बहुमत सिद्ध करून उद्धव ठाकरेंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलं. मुख्यमंत्रीपदाचा हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थावर संपन्न होणार आहे. (उद्धव कृष्ण तर मी सुदामा... 40 वर्षांच्या मैत्रीचा प्रवास)

How's the Josh हे अभिनेता विक्की कौशलच्या 'उरी' सिनेमातील गाजलेलं वाक्य. सैनिकांच मनोबळ वाढवण्यासाठी विक्की कौशलने म्हटलेला हा डायलॉग अतिशय लोकप्रिय झाला. आता संजय राऊतांनी महाराष्ट्राच्या जनतेला आणि शिवसैनिकांना पुन्हा हा उत्स्फूर्त प्रश्न विचारून मनोबळ वाढवलं आहे.