मुंबई : संजय राठोड (Sanjay Rathod) आज मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का? (Sanjay Rathod will attend Cabinet meeting Today?) असा सवाल विचारला जात आहे. ३ फेब्रुवारीपासून राठोड शासकीय कामकाजापासून दूर राहिलेले राठोड प्रकरणाचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वीस दिवसांहून अधिक काळ गायब झालेले संजय राठोड पोहरादेवी इथे समोर आले. तिथे आपली बाजू मांडल्यावर संजय राठोड यांना पालकमंत्री या नात्याने यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावाही घेतला. ३ फेब्रुवारीपासून मंत्रालय आणि शासकीय कामकाजापासून राठोड दूर होते. या काळात त्यांनी मंत्रिमंडळाच्या 2 बैठकांना दांडीही मारली. आता आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला तरी राठोड हजर राहणार का याची उत्सुकता आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राठोड प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
संजय राठोड यांना पोहरादेवी इथलं शक्तिप्रदर्शन भोवण्याची चिन्हं आहेत. संजय राठोड यांचं मंत्रिपद धोक्यात आलंय अशी सूत्रांची माहिती आहे. संजय राठोड प्रकरणी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केलीय. राठोड यांनी गर्दी जमवून केलेल्या शक्तिप्रदर्शनावरही शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. राठोड यांच्या प्रकरणामुळे आणि त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन होत असल्याचं चित्र दिसून येतंय. मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी गर्दीप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केल्याने राठोड यांचं मंत्रिपज धोक्यात आलं आहे.