बलात्कार करणाऱ्यास मिळायला पाहिजे 'सजा ए मौत' : संजय दत्त

प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. तो गुन्हा जर बलात्काराचा असेल तर, अशा गुन्हेगाराला 'सजा ए मौत'च मिळायला पाहिजे असे मत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने व्यक्त केले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 14, 2017, 08:30 PM IST
बलात्कार करणाऱ्यास मिळायला पाहिजे 'सजा ए मौत' : संजय दत्त title=

मुंबई : प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. तो गुन्हा जर बलात्काराचा असेल तर, अशा गुन्हेगाराला 'सजा ए मौत'च मिळायला पाहिजे असे मत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने व्यक्त केले आहे.

'भूमी' या आगामी चित्रपटातून संजय दत्त चाहत्यांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय दत्तने हे मत व्यक्त केले आहे. बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारास कोणत्याही प्रकारची दया-मया न दाखवता त्याला शिक्षा मिळायला पाहिजे, असे त्याने म्हटले आहे. संजय दत्त हा १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी आढळला होता. त्यामुळे न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा येरवडा जेलमध्ये भोगून तो बाहेर आला आहे. जेलमधून बाहेर आल्यावर संजय दत्तने पुन्हा एकदा नव्या जोमाने करिअरला सुरूवात केली आहे.

दरम्यान, संजय दत्तचा 'भूमी' हा चित्रपट वडील आणि मुलगीच्या नात्यावर अधारीत आहे. एका आयुष्यातील एका घटनेमुळे जीवनाची घडी विस्कटेल्या मुलीच्या वडिलांची भूमिका संजय 'भूमी'च्या माध्यमातून पार पाडत आहे. एनडीटीव्हीने टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बलात्कारासारख्या गुन्ह्यात इतर गुन्ह्याप्रमाणे मुळीच सहानभूती दाखवण्याची गरज नाही. अशा गुन्हेगाराला थेट 'सजा ए मौत'च मिळायला हवी.