मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी मनसेनं केलीय.
कमला मिल कम्पाऊंडमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी आयुक्त अजोय मेहतांवर फोन करून दबाव आणणारा महापालिकेतील नेता कोण? तो सत्ताधारी पक्षाचा आहे की मग विरोधी पक्षातला भैया आहे? त्यामुळे आयुक्तांनी त्याचं नाव जाहीर कारावं... नाहीतर खरं खोटं काय आहे हे बाहेर येण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलीय.
आगीच्या दुर्घटनेनंतर कारवाई थांबवण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता. असा गौप्यस्फोट आयुक्त अजोय मेहता यांनी शुक्रवारी महापालिका सभागृहात केला होता. त्यावर ते बोलत होते.