पुणे जिल्ह्याला संभाजी महाराजांचे नाव द्यावे : प्रकाश आंबेडकर

 राज्यात नामांतराचा वाद वाढत चालला आहे.

Updated: Jan 4, 2021, 02:59 PM IST
पुणे जिल्ह्याला संभाजी महाराजांचे नाव द्यावे : प्रकाश आंबेडकर title=

देवेंद्र कोल्हटकर : राज्यात नामांतराचा वाद वाढत चालला आहे. वेगवेगळ्या पक्षांकडून नामांतराची मागणी होत आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुणे जिल्ह्याच्या नामांतराची मागणी केली आहे.

औरंगाबादच्या नामकरणावरून लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा तसा संबंध नाही. संभाजी महाराज यांची समाधी पुण्यात आहे. त्यामुळे संभाजी राजे यांचे नाव द्यायचे असेल तर पुणे जिल्ह्याला द्यावे. अशी थेट मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

आता निवडणूका आल्या म्हणून हा मुद्दा चर्चेत आला आहे. शिवसेना- बीजेपी सत्तेत होते तेंव्हा नाव बदल का केला नाही ? असा सवाल ही त्यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील आता नामकरणा बद्दल बोलतायत सत्तेत असताना झोपले होते का ?. काँग्रेस शिवसेनेची भूमिका समजली आहे. राष्ट्रवादीने नामांतरा बद्दल आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. असं ही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

नवी मुंबई विमातळाच्या नामकरणा बद्दल  शासन स्थानिकांच्या भावनांचा विचार करेल अशी अपेक्षा आहे. असं ही त्यांनी म्हटलं आहे.