पहाटेच्या फायरिंगनंतर कसं आहे सलमान खानच्या घरचं वातावरण? मित्राने सांगितला तपशील

Salman khan House firing: गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाल्यानंतर जफर सरेशलवाला तात्काळ सलमान खानला भेटायला गेला.

Pravin Dabholkar | Updated: Apr 14, 2024, 02:53 PM IST
पहाटेच्या फायरिंगनंतर कसं आहे सलमान खानच्या घरचं वातावरण? मित्राने सांगितला तपशील title=
Salman Khan House Firing

Salman khan House firing: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या अनेक दिवसांपासून धमक्या मिळत आहेत. लॉरेन्स बिण्षोई गॅंगकडून उघडपणे सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. दरम्यान 14 एप्रिलची पहाट गॅलेक्सी अपार्टमेंटला धडकी भरवणारी ठरली. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गॅलेक्सीच्या भींतीवर 2 अज्ञातांनी फायरिंग केले. असे असताना सलमान खानच्या घरात काय वातावरण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. सलमान खानचा जवळचा मित्र आणि व्यावसायिक जफर सरेशवाला याने यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली. 

गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाल्यानंतर जफर सरेशलवाला तात्काळ सलमान खानला भेटायला गेला. त्याने घरात सर्वांची विचारपूस केली. गॅलेक्सीच्या बाहेर पडताना मीडियाने त्याला प्रश्न विचारले. यावर जफर याने उत्तरे दिली. 

कसे आहे सलमानच्या घरातील वातावरण?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमानच्या घरात एकदम सामान्य वातावरण आहे. केवळ भीती पसरवण्यासाठी हे कृत्य केलंय, असे जफर याने माध्यमांना सांगितले. फायरिंगची घटना झाली असली तरी सलमान खानचे वडील सलीम खान आपले नियमित रुटीन फॉलो करताना दिसले. इतर दिवसाप्रमाणे ते सकाळी वॉकला गेले होते. ते अजिबात घाबरले नव्हते. भीती पसरवण्यासाठी हे सारं केलं गेलं. पण सलमानच्या घरच्यांवर याचा काही परिणाम झाला नाही. 

सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार, 2 अज्ञातांकडून 4 राऊंड फायर

दरम्यान सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये दोघे संशयित आरोपी वेगाने अपार्टमेंटच्या दिशेने येताना दिसत आहेत. हेल्मेट घातल्याने त्यांचा चेहरा दिसत नाहीय. तसेच त्यांच्या बाईकचा नंबरदेखील दिसत नाहीय. क्राइम ब्रांच या आरोपींच्या मागावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान याला फोन करुन त्याची विचारपूस केली. 

सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचं धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर! CM शिंदेंशी चर्चा