पेंग्विनचं पिल्लू घरट्याबाहेर येणार नसल्याने पर्यटकांची निराशा

Updated: Aug 18, 2018, 04:47 PM IST

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातात जन्माला आलेल्या पहिल्यावहिल्या भारतीय पेंग्विनला पाहण्यासाठी मुंबईकरांसह पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केलीय. पेग्विंनच्या पिलाला पाहण्याच्या उत्सुकतेपोटी अनेकांची पावलं जिजामाता उद्यानाकडे वळल्याचं दिसून आलं. शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी सुमारे सहा हजार पर्यटकांनी इथं भेट दिल्याची माहिती समोर येतेय. यांत लहान मुलांचा अधिक समावेश होता.

पर्यटकांची निराशा 

मात्र पुढील तीन पहिने या पिलाला ऊब देण्याची गरज आहे. त्यामुळे ते घरट्याबाहेर येणार नसल्याने पर्यटकांची निराशा झालीय. दरम्यान पेंग्विनचं पिल्लू चांगलंच बाळसं घेऊ लागलंय. एका दिवसात त्याच्या वजनात काही ग्रॅमनी वाढ झालीय.  स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि काही पावलं टाकण्यासाठी या पिलाला आणखी एक दोन दिवस लागणार आहेत.