मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेची अंतर्गत गटबाजी टोकाला गेली आहे. ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर आणि आशीष चेंबूरकर यांना पक्षाने अचानक स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामा देण्यास सांगितले आहे.
कोऱ्या लेटरहेडवर या दोघांच्या सह्या घेतल्याचं कळतंय. आज होणाऱ्या महापालिका कामकाजात त्यांचे राजीनामे मंजुरीसाठी पटलावर ठेवले आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून चढाओढ सुरू झाली आहे.
मंगेश सातमकर, आशीष चेंबूरकर आणि यशवंत जाधव यांच्यामध्ये स्थायीच्या अध्यक्षपदासाठी मोठी चूरस आहे. सध्या रमेश कोरगावकर यांच्याकडे स्थायी समितीचं अध्यक्षपद आहे.
आता नव्या अध्यक्षाची निवड होऊ घातलेली आहे. त्यापार्श्वभूमीवर ज्येष्ठ नगरसेवकांनी जोरादर फिल्डिंग लावली आहे. त्यामुळं गटबाजीला ऊत आलाय. त्यावर तोडगा काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी सातमकर आणि चेंबूरकर यांचे राजीमाने घेतल्याचं बोललं जातंय.