Mumbai Corona : मुंबईत आता मॉलमध्ये जाण्यासाठी कोरोना चाचणी सक्तीची

मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (Mumbai Corona) मुंबई महापालिकेने (BMC)मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबईत जर तुम्हाला कोणत्या मॉलमध्ये (corona test to enter mall) जायचं असेल, तर कोरोना चाचणी करणं सक्तीचं करण्यात आलं आहे. अँटीजन टेस्ट (rapid antigen test) केलेली देखील चालणार आहे. 

Updated: Mar 19, 2021, 02:32 PM IST
Mumbai Corona : मुंबईत आता मॉलमध्ये जाण्यासाठी कोरोना चाचणी सक्तीची  title=

मुंबई : मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (Mumbai Corona) मुंबई महापालिकेने (BMC)मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबईत जर तुम्हाला कोणत्या मॉलमध्ये (corona test to enter mall) जायचं असेल, तर कोरोना चाचणी करणं सक्तीचं करण्यात आलं आहे. अँटीजन टेस्ट (rapid antigen test) केलेली चालणार आहे. 

२१ मार्चपर्यंत मॉल्सना तयारीसाठी वेळ 

सोमवारपासून हा निर्णय लागू होणार आहे. मॉल्सना तयारी करण्यासाठी हा २१ मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे. जर तुमच्याकडे कोरोना चाचणीचा अहवाल नसेल तर २२ मार्चपासून तुम्हाला मुंबईतल्या मॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही. 

एक टीम मॉल्सच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात असेल. जी मॉलमध्ये येणाऱ्या व्यक्तीची अँटीजन टेस्ट करेल. मुंबई महापालिकेने सांगितले आहे की, मुंबईतल्या सगळ्या मॉलमध्ये कोरोना वायरस टेस्टचे सँपल घेण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्टची सुविधा देण्यात येईल. 

मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागल्याने निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मास्क न घालणाऱ्यांना दंड ठोठावला जात आहे. लोक मास्क घालत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी मार्शल्स जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. 

याशिवाय मुंबईत बहुतांश कर्मचारी हे मुंबई लोकलने आपलं ऑफीस गाठतात. मात्र आता कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने जास्तीत जास्त लोकांना वर्क फ्रॉम होम करावं, असंही सांगण्यात आलं आहे. 

मुंबईसह महाराष्ट्र कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. मुंबईत १८ मार्चला नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही अडीच हजाराच्या घरात होती. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिका नियम कडक करत आहे.