आठवले गटाची मुंबईत बैठक

'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'च्या आठवले गटाची आज महत्वाची बैठक बोलावण्यात आलीय. 

Updated: Jan 6, 2018, 12:04 PM IST
आठवले गटाची मुंबईत बैठक title=

मुंबई : 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'च्या आठवले गटाची आज महत्वाची बैठक बोलावण्यात आलीय. 

पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. पक्षाचे राज्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत भीमा कोरेगाव येथील घटना आणि त्याचे राज्यभर उमटलेले पडसाद, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.