मुंबई महापालिकेत राम कदम यांचा तीव्र निषेध, जोरदार पडसाद

भाजप आमदार राम कदम प्रकरणाचे मुंबई महापालिका सभागृहातही पडसाद उमटलेत.

Updated: Sep 7, 2018, 07:12 PM IST
मुंबई महापालिकेत राम कदम यांचा तीव्र निषेध, जोरदार पडसाद title=

मुंबई : भाजप आमदार राम कदम प्रकरणाचे मुंबई महापालिका सभागृहातही पडसाद उमटलेत. महिलांबाबत बेताल वक्तव्य केल्याने याच्या विरोधात पालिकेत विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले. विरोधकांनी राम कदम यांचा जोरदार निषेध व्यक्त करत घोषणा दिल्यात. दरम्यान, भाजप नगरसेवक सभागृहात गप्पच होते.

दरम्यान, शिवसेनेने राम कदम यांना रावणाची उपमा दिली. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी तो राम नव्हे तर रावण, असे सांगत हल्लाबोल चढवला. त्यांने केवळ एका महिलेला हात लावून दाखवावेत, त्याचे हात मी तोडणार, अशा गंभीर इशाराच दिलीप लांडे यांनी दिला.

राम कदम यांचा निषेध व्यक्त करणारे निवेदन विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिले. तर काँग्रेस नगरसेवक काळ्या फिती लावून सभागृहात उपस्थित होते. यावेळी राम कदमांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांची लावून धरली. तर भाजपचे नगरसेवक सभागृहात चिडीचूप होते.