राज ठाकरे यांनी तब्बल 20 वर्षानंतर मनातील गुपित केलं उघड, निलेश खरे यांची विशेष मुलाखत

Raj Thackeray Exclusive Interview : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रथमच तब्बल 20 वर्षानंतर मनातील गुपित राज ठाकरे यांनी उघड केलं. सर्वात मोठी आणि स्फोटक मुलाखत मुख्य संपादक निलेश खरे यांनी घेतली. पाहा  'झी 24 तास'वर.

Updated: Jul 23, 2022, 04:23 PM IST
राज ठाकरे यांनी तब्बल 20 वर्षानंतर मनातील गुपित केलं उघड, निलेश खरे यांची विशेष मुलाखत  title=

मुंबई : Raj Thackeray Exclusive Interview : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रथमच तब्बल 20 वर्षानंतर मनातील गुपित राज ठाकरे यांनी उघड केलं. राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वात स्फोटक मुलाखत 'झी 24 तास'ला दिली. त्यावेळी राज यांनी अनेक गुपितं उघड केलीत. या आणि अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्रातल्या राजकारणातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि स्फोटक मुलाखत मुख्य संपादक निलेश खरे यांनी घेतली. 

शिवसेनेत बंडखोरी झाली. 40 आमदरांनी बंड करत भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले. फुटलेले आमदार सांगत आहेत, आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. त्यांचे हिंदुत्व आम्ही पुढे नेत आहोत. आमचीच खरी शिवसेना आहे. यावर राज ठाकरे यांनी आपले भाष्य केले. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं दिलीत. त्यांनी शिवसेनेवर भाष्य केले. यावेळी त्यांना महाबळेश्वरच्या 'त्या' अधिवेशनात तुम्हीच पक्षप्रमुख पदाचा प्रस्ताव टाकला होता, पस्तावताय आज?  ( 30 जानेवारी 2003ची गोष्ट. महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचे अधिवेशन भरले होते आणि तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच चर्चा सुरु होती, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा उत्तराधिकारी कोण - राज ठाकरे की उद्धव ठाकरे?)

त्यावर राज म्हणाले, बिल्कुल नाही. शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. ते बाळासाहेबांचं अपत्य आहे. त्या संपूर्ण काळामध्ये बाळासाहेबांच्या मनात काय चालू होतं. हे मला जाणवत होतं. मला माहिती होतं. राजकारणामध्ये अशा गोष्टी सांगितलेल्या लोकांना पचत नाहीत किंवा पटत नाहीत. पण तेव्हाही माझ्या मनात कधीही शिवसेनाप्रमुख व्हावं, अध्यक्ष व्हावं, असं कधीच नव्हतं. मी बाळासाहेबांना याबद्दल पत्रं पण लिहिली होती. मी त्याही काळात फक्त एकच गोष्ट विचारत होतो की, 'माझा जॉब काय?' म्हणून मी काकांना म्हटलं. उद्धवच्या पक्षप्रमुख पदाचा प्रस्ताव मीच मांडतो.

म्हणजे तुम्ही इतरांवरती सगळ्या जबाबदाऱ्या टाकणार आणि मला फक्त निवडणुकीला भाषणासाठी बाहेर काढणार. मी ज्यावेळेला भाषण देतो, त्यावेळेला मी एखाद्या गोष्टीला कन्व्हिन्स असतो. कन्व्हेक्शनने मी ते बोलत असतो. मी बोलल्यानंतर जर समजा ती गोष्ट झाली नाही,  तर मी पुढच्यावेळेला काय म्हणून जाऊन भाषण करायचं? म्हणजे मी दुसऱ्यांच्या जीवावरती माझा शब्द टाकत बसायचा हे शक्य नव्हतं. उरला विषय समजा अध्यक्षपदाचा तर तो निर्णय बाळासाहेबांचा होता. बाळासाहेबांच्या मनात काय होती मी बाळासाहेबांना महाबळेश्वरला सांगितलं. 

या आणि अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले. पाहा ही स्फोटक मुलाखत. सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकारणातील आतापर्यंतची सर्वात मोठी मुलाखत. Black And White या विशेष कार्यक्रमात ही मुलाखत आज संध्याकाळी 7:00 वाजता आणि रात्री 9:00 वाजता पाहा  फक्त 'झी 24 तास'वर.