मुंबई : Municipal Elections News : राज्यातील महापालिका निवडणुका (Municipal Elections) कधीही जाहीर होतील. अजून तरी वातावरणात निवडणूक दिसत नाही. मात्र, निवडणुका कदाचित लागतीलच, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले आहे. निवडणुकीसाठी तयार राहा, असे संकेत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत. (Raj Thackeray On Municipal Elections)
मुंबई महानगरपालिका निवडणुकी पूर्वी मुंबईत पक्ष कार्यालये उघडण्याचा मनसेचा धडाका सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रभादेवी इथे मनसे शाखेचे उदघाटन करण्यात आले. (Raj Thackeray inaugurates MNS office in Mumbai) त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, निवडणुका कदाचित लागतीलच. अजून तरी वातावरणात निवडणूक दिसत नाही. निवडणुकांच्यावेळी सगळ्यांची पकपक सुरू होईल. तेव्हा आमची ही सुरू होईल. कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवावे ही शाखा आहे दुकान नव्हे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात बजावले आहे.
प्रत्येक शाखेत कार्यालयात तसेच सरकारी कार्यालयात शिवाजी महाराजांची एक पाटी पाठवणार आहे. ज्यावर शिवाजी महाराजांचे वाक्य लिहलेले असेल. कारभार ऐसा करावा की रयतेच्या भाजीच्या देठाला ही हात लावू नये, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्याआधी राज ठाकरे यांनी पुण्याचा दौरा केला होता. राज ठाकरे यांनी मुंबईबरोबरच पुणे आणि नाशिक महापालिकेवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. निवडणुकीत जोरदार उतरण्याची मनसेकडून तयारी करण्यात येत आहे.