जे कराल ते राज्यासाठी करा- राज ठाकरेंचं मराठी उद्योजकांना आवाहन
Updated: Jun 6, 2018, 01:57 PM IST
मुंबई : मराठी उद्योजकांनी आक्रमक व्हावे, असे महाराष्ट्र बिजनेस क्लबमध्ये मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले. पहा त्यांनी केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे...
महानगर पालिकेत कंत्राटदार राजस्थान मधील एका गावातील आहेत.
महाराष्ट्र ही भुमी आपण समज़ुन घेतली पाहीजे.
बाहेरून लोक आले ते व्यवसाय करत बसले आपले लोक नोकरी करत बसले.
महाराष्ट्रात सर्व सोयीसुविधा असल्याने बाहेरून लोक व्यवसायासाठी आले.
बाहेरील लोकांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो.
महाराष्ट्रातील शहरांचे महत्व दुर्दैवाने मराठी लोकांना समजत नाहीयं.
शहरांमध्ये मराठी लोकसंख्या कमी होत आहे आणि बाहेरील लोकांची संख्या वाढत आहे.
मराठी माणसाला व्यवसायात आक्रमक व्हावे लागेल
महाबळेश्वर मध्ये ६०ते ७० % लोक हे गुजराती जातात.
आपल्या देशाच्या पंतप्रधानांना जर वाटत असेल की आपल्या राज्याचा विकास व्हवा त्यांच्या सतत मनात तेच असतं.
सर्व गोष्टी गुजरात मध्येच. बुलेट ट्रेन गुजरात मध्येच का ? दुसरीकडे का नाही ?
ठाणे जिल्ह्यात ७-८ महानगरपालिका आहेत ठाण्यात लोकसंख्या वाढत आहे.
ही शहरं जर मराठी माणसाच्या हातातून गेली तर तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्थळांवर स्वःताचा ठसा उमठवा.
वेगवेगळ्या राज्याची भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे.
भारतातील प्रत्येक राज्य हा एक देश आहे.
महाराष्ट्रावरती मी एक डाॅक्युमेन्ट्री बनवतोय.
मी राजकीय पक्ष काढला या मध्ये पण चढ उतार होतात.
सर्वकाही कोकणात असताना तिकडे चायनिज ची दुकाने आहेत, कोकणात काय असं कमी आहे की तिकडे चायनिज दुकाने लागतात.
महाराष्ट्रातील ८ भारत रत्नांपैकी ७ भारत रत्न ही कोकणपट्ट्यातील आहेत आणि या पैकी चार भारतरत्न ही दापोलीतील आहेत.
मराठी उद्योजकांना पुढे घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करेन.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.