मुंबई : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 50 वा वाढदिवस आहे. आज राज ठाकरेंनी ईव्हीएम मशीनचा केक कापून वाढदिवस साजरा केला. यंदा 50 व्या वाढदिवसाचा योग असल्यानं कार्यकर्त्यांच्या उत्साह आणखी द्विगुणित झालाय. राज ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी 'कृष्णकुंज' वर पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि चाहत्यांची रीघ लागलीय..
पालघरचे मनसेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी यावेळी राज ठाकरे यांच्यासाठी ईव्हीएम मशीनचा केक आणला होता. दरम्यान वाढदिवसाचे औचित्य साधत मनसे भाजप सरकारने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात अभिनव आंदोलन करणार आहे... आज मुंबईतल्या 36 पेट्रोल पंपांवर दुचाकी चालकांना 4 रुपये सवलतीच्या दरात पेट्रोल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पालघर येथील मनसे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त EVM ची प्रतिकृती असलेला केक तयार केला होता. तो आज त्यांनी कृष्णकुंजवर आणला. तो केक ठाकरे यांनी कापला. हीच का ती मतदानातली पारदर्शकता ? असा प्रश्न त्या केकवर होता.