व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी मोदी-शहांना फटकारलं

  राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे लगावले आहेत, तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेते कमल हासन यांच्या प्रवेशावर त्यांनी भाष्य केले आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 3, 2018, 06:59 PM IST
व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी मोदी-शहांना फटकारलं title=

मुंबई :  राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे लगावले आहेत, तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेते कमल हासन यांच्या प्रवेशावर त्यांनी भाष्य केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पुन्हा एकदा भाजपला फटकारलं आहे. 

हा‘तामिळनाडू’ नावाचा तलाव

तलावात दोन कमळ दाखवण्यात आले आहेत हा‘तामिळनाडू’ नावाचा तलाव आहे. एक कमळ आकाराने मोठं आहे, तर दुसरं लहान आहे. 

अस्मितेसमोर भाजपचं कमळ लहान

मोठ्या कमळावर अभिनेते कमल हसन उभे आहेत, कमळाच्या पाकळ्यांवर लिहिले आहे ‘तामिळ अस्मिता’. तर त्याच तलावात दुसऱ्या लहान कमळाच्या बाजूला ‘भाजप’ असे लिहिले आहे. तलावाच्या काठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह उभे आहेत.

मोदी अमित शहांना म्हणतात...

“साहेब, हे अचानक कुठून उगवलं आता?” असं अमित शाह हे मोदींना उद्देशून बोलत आहेत.

राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून सध्या अमित शाह, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फटकारत आहेत. राज यांनी तामिळनाडूच्या राजकारणावरून हे फटकारे लगावले आहेत. राज यांनी तामिळनाडूतल्या अस्मितेचा आधार घेत मोदी-शाह यांना फटकारलं आहे.