शिंदे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित दसरा मेळावा? राज ठाकरे प्रमुख पाहुणे?

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

Updated: Sep 2, 2022, 06:46 PM IST
शिंदे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित दसरा मेळावा? राज ठाकरे प्रमुख पाहुणे? title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई  : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहिले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं विधान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी केलंय. 

त्यामुळे शिवाजी पार्कवर राज ठाकरेही उपस्थित राहणार का? की शिंदे आणि राज ठाकरे एकत्रित दसरा मेळावा घेणार? यावरून नव्या चर्चांना उधाण आलंय. जे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जातायत, त्यांना दसरा मेळाव्याचे आमच्याकडून आमंत्रण दिले जाईल. राज ठाकरे  देखील हिंदुत्वाची भूमिका पुढे घेऊन जातायत तर त्यांनादेखील आमंत्रण दिले जाईल असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय.

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा अर्ज
एकनाथ शिंदे गट यंदा शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) आग्रही आहे. यासाठी एकनाथ शिंदे गटाने अर्ज केला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर (Mla Sada Sarvankar) यांनी अर्ज केला आहे. शिवाजी पार्कात गेल्या काही दशकांपासून शिवसेना दसरा मेळावा घेत आहे. त्यामुळे आता या अर्जाबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय.