Rahul Gandhi : ठाकरेंच्या मैदानात राहुल गांधींचा एल्गार, पंतप्रधान मोदींवर टीका करत म्हणाले 'राजाचा जीव ईव्हीएममध्ये...'

Rahul Gandhi Speech On Shivaji Park : नरेंद्र मोदी ईव्हीएम मशिनशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Mar 17, 2024, 09:09 PM IST
Rahul Gandhi : ठाकरेंच्या मैदानात राहुल गांधींचा एल्गार, पंतप्रधान मोदींवर टीका करत म्हणाले 'राजाचा जीव ईव्हीएममध्ये...' title=
Rahul Gandhi Speech On Shivaji Park INDIA Alliance Rally

Rahul Gandhi INDIA Alliance Rally : काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat JodoNyay Yatra) समारोप शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेने झाला. राहुल गांधी यांनी शिवतिर्थावर (Shivaji Park) इंडिया आघाडीसमोर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावेळी 56 इंचची छाती नाही, केवळ पोकळ व्यक्ती आहे, असं म्हणत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींवर हल्लाबोल केला. देशाला नवी दिशा देण्यासाठी यात्रेचा समारोप मी धारावीमध्ये केला, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं. त्यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) चौफेर टीका केली.

काय म्हणाले राहुल गांधी?

गेल्यावर्षी आम्ही कन्याकुमारीपासून यात्रेची सुरुवात केली. आम्हाला भारत जोडो न्याय यात्रा करावी लागली. या यात्रेत अनेक दिग्गज नेत्यांनी समाभाग नोंदवला. त्यामुळे ही फक्त राहुल गांधीची एकट्याची यात्रा नव्हती, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. आमची लढाई भाजपविरुद्ध नाही, नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध देखील नाही. पण त्याच्या मागील शक्तीविरुद्ध आहे. राजाचा जीव इव्हीएममध्ये आहे. त्याचा जीव ईडीमध्ये आहे, सीबीआयमध्ये आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला बोल केला. भाजपच्या बैठकीत गडकरींना बाहेर काढलं जातं, असंही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसचा एक बडा नेता माझ्या आईसमोर ढसाढसा रडला. माझी या शक्तीविरुद्ध लढण्याची ताकद नाही, मला जेलमध्ये जायचं नाहीये, असं त्या नेत्याने सांगितलं. जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवून लोकांना धमकवलं जातंय, असं राहुल गांधी म्हणाले. 10 दिवसात लग्नासाठी इंटरनॅशनल एअरपोर्ट कसं उघडलं जातं? असा सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केला. 

मोदींकडे भ्रष्टाचार नावाची मोनोपॉली

नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय जिंकू शकत नाहीत. निवडणूक आयोग मशिन का दाखवत नाही? ईव्हीएमच्या कागदाची मोजणी करण्यास सरकार तयार नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी टीका केली. जेव्हा चीनला फायदा होतो, तेव्हा इथल्या करोडपतींना लाभ होतो. मोदींकडे भ्रष्टाचार नावाची मोनोपॉली आहे. पण मला विश्वास आहे, तुम्ही देशात प्रेमातं दुकान उघडाल. मला विश्वास आहे, 'आप नफरत के बाजार मैं मोहोब्बत की दुकान खोलेंगे', असं म्हणत राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडला आहे.

शरद पवार काय म्हणाले?

भारताच्या स्थितीत बदल घडवण्याची गरज आहे. देशाची ताकद ज्या लोकांच्या हातात आहे, त्यांनी शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि सर्व घटकांचा हिरमोड केलाय. तुम्हाला त्यांच्याकरून आश्वन दिलं जातील, पण तुम्ही बळी पडू नका. तुम्हाला खूप आश्वसने दिली गेली आहेत. याच मुंबईतून महात्मा गांधींनी चलो जाओ म्हणत इंग्रजांना हकलून लावलं होतं. पण आता भाजपला चलो जाओ म्हण्याची वेळ आलीये, असं शरद पवार म्हणाले.

मेहबुबा मुफ्ती म्हणतात...

आज मी पाहतेय की इथे वेगवेगळ्या विचारांचे आणि विचारांचे लोक जमले आहेत. हा भारत आहे... निवडणुका येऊ घातल्या आहेत आणि संविधानाचे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे तुमचे मत, त्याचा वापर तुम्ही योग्यरित्या कराल, यावर माझा विश्वास आहे, असं म्हणत मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

भाजपच्या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं, नि आता त्यांच्या डोक्यात हवा गेलीय. गांधीजींनी मुंबईतून इंग्रजांना ‘चले जाओ’ सांगितलं होतं, आता लोकशाही मारण्यासाठी टपलेल्या हुकूमशाहीला तडीपार करण्यासाठी ‘शिवाजी पार्क’ निवडलेलं आहे. देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तरच आपण वाचू. व्यक्तीची ओळख ही देश असली पाहिजे, देशाची ओळख ही एक व्यक्ती होता कामा नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.