VIDEO : सर्वांसमोर हात धरून त्याला खेचलं आणि.., Mukesh Ambani यांनी साखरपुड्याला मुलाला दाखवलं डोळे...

Anant Radhika Engagement : मुंबईतील हायप्रोफाईल एंगेजमेंट पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलाच्या कृत्यामुळे राग आला आणि त्याने सर्वांसमोर त्याचा हात धरून...

Updated: Jan 22, 2023, 01:44 PM IST
VIDEO : सर्वांसमोर हात धरून त्याला खेचलं आणि.., Mukesh Ambani यांनी साखरपुड्याला मुलाला दाखवलं डोळे... title=
radhika anant engagement Inside Video mukesh ambani shows eye to aaksah ambani Pulled him by the hand in front of everyone viral on social media marathi news

Anant Radhika Engagement Inside Trending Video : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या धाकटे चिरंजिव अनंत (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट  (Radhika Marchant) साखरपुडा मोठा थाट्यामाट्यात पार पडला. गुरुवारी पार पडलेला या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. मुंबईतील अँटिलियामध्ये राधिका मर्चंट या धाकट्या सूनेचं स्वागत करताना मुकेश अंबानी यांचं एक कृत्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

अंबानी कुटुंब मूल्यांसाठी प्रसिद्ध

सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. पारंपरिक आणि रीतीरिवाजानुसार गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या नवीन सूनचं स्वागत करण्यात येतं आहे. नीता अंबानी आरती करुन राधिकाचं घरात स्वागत करत आहे. अंबानी कुटुंबातील इतर सदस्य कोकीलाबेन, मुकेश अंबानी, ईशा अंबानी, थोरला मुलगा आकाश, थोरली सून श्लोका आणि जावई आनंद पिरामलसोबत अनेक जण दिसतं आहेत. मोठी सून श्लोका सासू नीता अंबानी यांच्यासोबत पूजेचं साहित्य घेऊन उभी आहे.

अन् म्हणून मुकेश अंबानी यांनी हात खेचला...

राधिकाच्या स्वागतासाठी अंबानी कुटुंब एकत्र असताना तिथे मोठा मुलगा आकाश मस्तीचा मूडमध्ये दिसतं होता. खरं तर अंबानी कुटुंब त्यांचा मूल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. ते कायम एका शिस्तबद्ध पद्धतीने, नम्रपणे सगळ्या परंपरा पाळत असतात. अशात आकाशचं असे मस्त करण्याचा अंदाज मुकेश अंबानी यांना आवडतं नाही. आकाश अंबानी आपले जीजाची म्हणजे अंबानी कुटुंबाचे जावई आनंद पिरामलच्या खांद्यावर हात ठेवून मस्त करताना दिसून येतं आहे. 

मुकेश अंबानी यांच्या ही गोष्ट लक्षात येतात ते डोळ्याने आकाशला श्लोकच्या जवळ उभं राहण्याचा इशारा देतात. इशारा दिल्यानंतरही आकाश हलत नाही पाहून अखेर मुकेश अंबानी हात धरुन मुलाला श्लोका यांच्या बाजूला उभ करतात.