भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात वानखेडे स्टेडिअमवर सीएएला विरोध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना दरम्यान मैदानात काही प्रेक्षकांकडून सीसीए कायद्याला विरोध करण्यात आला.

Updated: Jan 14, 2020, 06:51 PM IST
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात वानखेडे स्टेडिअमवर सीएएला विरोध title=

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला वनडे सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगत आहे. पण या दरम्यान मैदानात काही प्रेक्षकांकडून सीसीए कायद्याला विरोध करण्यात आला. देशभरात या कायद्य़ाला विरोध सुरु असताना आता वानखेडे स्टेडियममध्ये ही काही जणांनी याला विरोध केला.  

मुंबईत सुरु असलेल्या सामन्याच्या दरम्यान काही जणांनी टी-शर्ट घालून या कायद्याचा विरोध केला. नो सीएए, नो एनपीआर, नो एआरसी असं या टीशर्टवर लिहिलेलं आहे. या कायद्याच्या विरोधात आंदोलन होईल या पार्श्वभूमीवर वानखेडेवर काळ्या कपड्यांना आधीच बंदी होती. अशी माहिती मिळते आहे. पण या प्रेक्षकांनी पांढरे टीशर्टवर एक एक वेगळं अक्षर लिहून आणलं होतं. त्यामुळे पोलिसांना ही ते ओळखता आलं नसेल. पण जेव्हा ते एका ओळीत उभे राहिले तेव्हा हे लक्षात आलं.

याआधी श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात ही गुवाहाटीमध्ये काही प्रेक्षकांनी सीएएच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. देशभरात सीएए कायदा लागू झाला आहे. पण काही राज्यांनी हा कायदा लागू करण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्रात देखील हा कायदा लागू होणार नाही असं शिवसेनेने संकेत दिले आहेत.