'उदयनराजेंकडे भाजपसमोर लोटांगण घालण्याशिवाय पर्याय नाही'

लाचारीमुळे ते इतरांकडे बोट दाखवत आहेत.

Updated: Jan 14, 2020, 06:42 PM IST
'उदयनराजेंकडे भाजपसमोर लोटांगण घालण्याशिवाय पर्याय नाही' title=

मुंबई: उदयनराजे भोसले यांना भाजपासमोर लोटांगण घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. भविष्यात काहीतरी मिळेल यासाठी ते लाचारीने बोलत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली. उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत महाविकासआघाडी आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. शरद पवार यांना देण्यात आलेल्या 'जाणता राजा' या उपाधीवरून उदयनराजे भोसले यांनी आक्षेप घेतला होता. 

या टीकेला प्रत्युत्तर देताना नवाब मलिक यांनी म्हटले की, शरद पवार यांनी स्वत:ला कधीच जाणता राजा म्हणवून घेतलेले नाही. राष्ट्रवादीनेही त्या शब्दाचा कधी वापर केला नसल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

होय, शरद पवार जाणता राजाच; आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार

मात्र, उदयनराजे हे भाजपात गेल्यापासून त्यांच्याकडे भाजपासमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. काही मिळेल याच आशेने ते भाजपमध्ये गेले होते. ते गोयल यांचा कुठेही निषेध करत नाहीत. भाजपाच्या विरोधात काही बोलत नाहीत. याचा अर्थ लाचारीमुळे ते इतरांकडे बोट दाखवत आहेत, अशी टीका मलिक यांनी केली. 

'जिभेला लगाम घाला'; संभाजीराजेंच्या 'त्या' ट्विटला संजय राऊतांचा रिप्लाय

तर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनीही उदयनराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. उदयनराजे हे भाजपची भाषा बोलत आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे किती गांभीर्याने घ्यायचे, याचा विचार झाला पाहिजे. आम्हाला कुणी शिवाजी महारांजाविषयीचे प्रेम शिकवण्याची गरज नाही, असे अनिल परब यांनी सांगितले.