'सरसकट मालमत्ता करमाफी' मिळेपर्यंत देयके पाठवली जाणार नाहीत

पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता करमाफी देण्याच्या शासनाच्या धोरणामुळे मुंबईतील सुमारे १ लाख ३७ हजार सदनिकाधारकांना दिलासा मिळणार आहे.

Updated: Dec 28, 2019, 11:59 AM IST
'सरसकट मालमत्ता करमाफी' मिळेपर्यंत देयके पाठवली जाणार नाहीत title=

मुंबई : पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता करमाफी देण्याच्या शासनाच्या धोरणामुळे मुंबईतील सुमारे १ लाख ३७ हजार सदनिकाधारकांना दिलासा मिळणार आहे. पण संपूर्ण करमाफी मिळेपर्यंत या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची देयके न पाठवण्याचा निर्णय मुंबई पालिकेनं घेतला आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेच्या तिजोरीला ३३५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

मुंबई पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने अडीच वर्षापूर्वी मालमत्ता करमाफी देण्याचा निर्णय़ घेतला होता. ही करमाफी ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांसाठी मंजूर करण्यात आली होती. 

५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफीचा अशासकीय प्रस्ताव लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाकडून मंजूर करून घेण्यात होता. 

मुंबई महापालिका पाठोपाठ नवी मुंबई महापालिकेतही ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. साधारण अडीच वर्षापूर्वी घेण्यात आलेला हा निर्णय मंजूर होवूनही, याची अंमलबजावणी करण्यास वेळ जात आहे हे विशेष.