मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या (BMC Elections 2022) तोंडावर भाजपकडून (BJP) पोलखोल अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी संपूर्ण मुंबईत पोलखोल अभियान रथ (Polkhol Abhiyan Rath) फिरवण्यात येणार आहे. पण काल पहिल्याच दिवशी चेंबूरमध्ये या पोलखोल अभियान रथाची अज्ञातांकडून रात्रीच्यावेळेस तोडफोड करण्यात आली होती.
याप्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेत चेंबुर पोलीस स्थानकाला घेराव घालण्यात आला होता. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करत पोलिसांना अल्टिमेटम देण्यात आला होता. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं यात युवा सेनेचा एक पदाधिकारी असल्याचा दावा भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे.
सीसीटीव्हीत (CCTV) युवासेनेचा पदाधिकारी दिसला असून, पोलीस त्याची खातरजमा करत असल्याची माहिती दरेकर यांनी दिली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर भाजपने चेंबूर पोलीस स्थानकात आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता गुन्हा दाखल झालाय. भाजपकडून मुंबई महानगर पालिका पोलखोल अभियान सुरू असून, गेल्या 25 वर्षाचा आपला काळा इतिहास समोर येईल म्हणून हे सर्व सुरू आहे असल्याचं आरोप दरेकरांनी केलाय...
भाजपची पोलखोल यात्रा दंडेलशाहीने अडवण्याचा प्रयत्न होता, त्या करता दगडफेक घडवून आणली. पण लोकशाहीत अशा प्रकारची मुस्काटदाबी चालणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही चेंबूर पोलीस स्टेशनला घेराव घातला. त्यावेळी त्यांना अल्टीमेटम दिला होता. याची दखल घेत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
आम्हाला मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक युवासेनेचा प्रतिनिधी दिसतोय. त्या प्रतिनिधीचे फोटो असलेले फ्लेक्स आपल्याकडे आलेले आहेत असं दरेकर यांनी म्हटलं आहे.