मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे प्रकाश मेहता अडचणीत

एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत. 

Updated: Jul 31, 2017, 09:45 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे प्रकाश मेहता अडचणीत  title=

मुंबई : एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत.

बिल्डरला ५०० कोटी रुपयांचा नफा मिळवून देण्यासाठी प्रकाश मेहतांनी शेरा दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर उत्तर देत मेहतांनी शेरा दिल्याची कबुली दिली. त्या फाईलवर चुकून शेरा दिल्या असून दुस-या दिवशी ती फाईल एसआरएला पाठवली नसल्याचा दावा मेहतांनी केला. मात्र या उत्तरावरही विरोधकांनी आक्षेप घेतला.