कोविंद यांना उमेदवारी म्हणजे राज्यघटना बदलण्याचा डाव - प्रकाश आंबेडकर

रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपदाची उमेदवारी म्हणजे देशाची राज्यघटना बदलण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघांचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यावेळी देशाचा राष्ट्रपती आदिवासी समुहातून असावा असं आपलं मत आहे, मात्र उमेदवार निश्चितीमध्ये विरोधी पक्ष प्रभावहीन ठरत असल्यानं संघ परिवाराचं फावत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Updated: Jun 20, 2017, 03:54 PM IST
कोविंद यांना उमेदवारी म्हणजे राज्यघटना बदलण्याचा डाव - प्रकाश आंबेडकर title=

पुणे : रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपदाची उमेदवारी म्हणजे देशाची राज्यघटना बदलण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघांचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यावेळी देशाचा राष्ट्रपती आदिवासी समुहातून असावा असं आपलं मत आहे, मात्र उमेदवार निश्चितीमध्ये विरोधी पक्ष प्रभावहीन ठरत असल्यानं संघ परिवाराचं फावत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

रामनाथ कोविंद यांना एनडीएतील घटकपक्षांपैकी शिवसेना वगळता सर्वांचा पाठिंबा आहेच. त्याचबरोबर दक्षिणेतील राज्यांनी कोविंद यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात तेलंगणाचे सत्ताधारी टीआरएस आंध्रप्रदेशातला प्रमुख पक्ष असणारा जगन रेड्डींचा वायएसआर-काँग्रेस यांचा समावेश आहे. दरम्यान आज संध्याकाळी सहा वाजता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना नेत्यांची बैठक मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेना आपली राष्ट्रपतीपदाच्या उमेदावाराविषयीच भूमिका स्पष्ट करणार आहे.