दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : एनसीबीने तपास केला नाही तर चार ते पाच दिवसात पोलिस तपास सुरू करणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन नेमकं काय आहे? याबाबत तपास सुरू आहे. भाजप नेत्यांच्या ड्रग कनेक्शनबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज दुसऱ्यांदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
यापूर्वी सावंत यांनी केलेली तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपासासाठी एनसीबीकडे पाठवली होती. मात्र एनसीबी याचा तपास का करत नाही, ते कुणाच्या दबावाखाली आहेत का? असा सवाल उपस्थित होत होता. सचिन सावंत यांनी दिलेली दुसरी तक्रारही आपण एनसीबीकडे तपासासाठी पाठवत आहोत, जर एनसीबीने तपास केला नाही तर पोलीस याचा तपास करतील अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
I had demanded with NCB to investigate the BJP Drug connection in bollywood. In my questions to NCB I had specifically mentioned name of Aditya Alva found in Sandalwood drug racket who is brother in law of Vivek Oberoi who is partner of Sandeep Ssingh. But NCB didn't pay heed https://t.co/lwHGTtvujc
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 16, 2020
ड्रग कनेक्शनमधीस संदीप सिंहचे भाजप नेत्यांशी असलेले संबंध यामुळे बॉलिवूड आणि भाजप नेते पुन्हा चर्चेत आले आहेत. तसंच भाजपचे मागील निवडणुकीतील स्टार प्रचारक विवेक ऑबेरॉय यांचे ड्रग कनेक्शनचा तपास करण्याची सचिन सावंत यांची मागणी केली आहे. विवेक ऑबेरॉय हे नरेंद्र मोदी बायोपिकचे निर्माते आहेत.
But now Bengaluru police hv raided house of Vivek Oberoi who is not only co-producer of Narendra Modi Biopic but also played role of Modi ji. Several Qns still unanswered as to why only this company was chosen for signing an MOU by Guj govthttps://t.co/uVqV2J8gko
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 16, 2020
बंगलोर पोलीस मुंबईत येऊन विवेक ऑबेरॉयची चौकशी करतात, मग एनसीबी तपास का करत नाही? असा सवालही यावेळी उपस्थित झाला आहे.