'कसा रे तू मुंबईकर' व्हिडीओ व्हायरल

 मुंबईकरांसह सर्वांना झाडांच्या संरक्षणासाठी जागृत करणारा व्हिडीओ माटीबनने प्रकाशित केला आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 14, 2017, 08:59 PM IST

मुंबई : मुंबईकरांसह सर्वांना झाडांच्या संरक्षणासाठी जागृत करणारा व्हिडीओ माटीबनने प्रकाशित केला आहे. 

प्रसिद्ध अभिनेते पियुष मिश्रा यांनी चिपको रे ही चळवळ झाडांना वाचवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केली आहे, त्यातील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

खास करून मुंबईतील आरेचं जंगल वाचवण्यासाठी ही चळवळ असल्याचं अधोरेखित करण्यात आलं आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू आहे, शहरातही इमारती बांधण्यासाठी झाडांची कत्तल सुरू आहे, हे कत्तल थांबवण्याचा या चळवळीमागील उद्देश आहे.

संपूर्ण व्हिडीओ पाहा