पंकजा मुंडे यांच्या मनात कमळ आणि कमळच?

भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय?

Updated: Dec 3, 2019, 11:42 AM IST
पंकजा मुंडे यांच्या मनात कमळ आणि कमळच? title=

मुंबई : भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय? हे अजूनही समजत नाही. पंकजा मुंडे यांनी आज डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्यात कमळ दिसून येतं आहे. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर मात्र अजूनही भाजप दिसत नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय. 

१ डिसेंबरला पंकजा मुंडेंनी भावनिक पोस्ट फेसबुकवर टाकत कार्यकर्त्यांना साद घातली होती. १२ डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरून संवाद साधणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर काल ट्विटर अकाऊंटवरून भाजप डिलीट केलं होतं.

आता आज पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये कमळ चिन्ह दिसून येतंय. त्यामुळे त्यांची काय भूमिका आहे हे समजत नाहीय.

विधानसभा निवडणूक पंकजा मुंडे यांनी भाजपाकडून परळी विधानसभा मतदारसंघातून लढवली. मात्र त्यांचा यात निवडणुकीत पराभव झाला, त्यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला, धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली. आता पंकजा मुंडे विधान परिषदेतून आमदार होतात का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.